ओतूर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
ओतूर - डांग सेवा मंडळ नाशिक संचलित माध्यमिक,उच्च माध्यमिक व न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल ओतूर येथील वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा मा.हेमलताताई बिडकर ह्या होत्या. कार्यक्रमाची सुरवात संस्थापक अध्यक्ष कर्मवीर दादासाहेब बिडकर,संस्थेचे माजी सचिव…
