ओतूर (दि.२२नोव्हेंबर,२०२५)-डांग सेवा मंडळ व साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थास्तरीय जनता विद्यालय,अभोणा येथे आयोजित व्यक्ती चरित्र चित्रण स्पर्धेत माध्यमिक विद्यालय ओतूर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.
या स्पर्धेत इ ५ वी च्या गटात तनिष्का देवरे-प्रथम, विद्या देवरे - द्वितीय, अनुष्का भामरे- तृतीय,
इ ६ वी च्या गटात अनन्या वानखेडे-तृतीय, आराध्या देवरे-उत्तेजनार्थ, इ ८ वी च्या गटात देवयानी जोपळे - द्वितीय,वैष्णवी देसाई - उत्तेजनार्थ, इ ९ वी च्या गटात तनिष्का शिरसाठ - उत्तेजनार्थ,पुजा देसाई -उत्तेजनार्थ क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
वरील सर्व विद्यार्थ्यांचे डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा मा.हेमलताताई बिडकर,सचिव मृणालताई जोशी तसेच सर्व संचालक मंडळ,विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीम.जे.पी.पवार,पर्यवेक्षिका सौ. व्ही.सी.आचार्य व सर्व शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.🌹🌹🌹
