ओतूर - येथील डांग सेवा मंडळ,नाशिक संचलित माध्यमिक विद्यालय ओतूर येथे इयत्ता दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापिका जे.पी.पवार ह्या होत्या. यावेळी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ.व्ही.सी.आचार्य,सर्व शिक्षक वृंद व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने व दिप प्रज्वलनाने करण्यात आली. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांकडून सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा गुलाब पुष्प व पेन देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी राखी काळे,सिद्धी देसाई,सई शिरसाठ,रिद्धी देसाई,विद्या जोपळे,मृदुला मोरे आदींनी इयत्ता पाचवी ते दहावी या सहा वर्षांत आलेले शाळेचे अनुभव व गमतीजमती आपल्या मनोगतात भावुक होऊन व्यक्त केल्या. त्यानंतर श्री.व्ही.एम.चौधरी,श्री.एस. एस.कुलकर्णी,श्री.एस. आर. राठोड, श्रीम.एस.आर साळुंके,श्री.एस.एन.गायकवाड यांनी आपल्या मनोगतातुन विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनाची सूत्रे सांगितली तसेच विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ.व्ही.सी.आचार्य यांनी विद्यार्थ्यांना यशाचे रहस्य सांगितले. परीक्षा काळात परीक्षा केंद्रावर काय केले पाहिजे, आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे,शाळेची व आई वडिलांची मान उंचावण्यासाठी मेहनत,जिद्द व कष्ट केले पाहिजे तसेच येणाऱ्या भविष्य काळात विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जात जीवनात काहीतरी होण्याचे स्वप्न बाळगले पाहिजे असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापिका जे.पी.पवार यांनी केले. तसेच आपले मनोगत व्यक्त करतांना विद्यार्थ्यांनी न घाबरता परीक्षेला सामोरे जावे व यशस्वी व्हावे अशा शुभेच्छा दिल्या. शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत दहावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाला १२ डजबिन भेट म्हणून दिली.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री.ए.एस.गीते यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे नियोजन दहावी वर्गशिक्षक श्रीम.एम.डी.पवार व श्री.एस.एस.चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन व आभार दहावीच्या विद्यार्थिनी मृदुला मोरे,लावण्या अहिरे,रिद्धी देसाई व तनुजा देवरे यांनी केले.
