News Cover Image

माध्यमिक विद्यालय ओतूर येथे राष्ट्रभाषा हिंदी दिन साजरा...

     ओतूर-डांग सेवा मंडळ नाशिक संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ओतूर येथे राष्ट्रभाषा हिंदी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेरो-शायरी,कविता,सामुहिक हिंदी गाणे,वक्तृत्व,नाटक इत्यादी विविध उपक्रमांनी हिंदी भाषेचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. 
      राष्ट्रभाषा हिंदी दिनानिमित्त विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम.जयश्री पवार यांनी हिंदी भाषेचे महत्त्व सांगून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.त्यानंतर विद्यालयाच्या पर्यवेक्षिका वसुधा आचार्य, विद्यालयाचे हिंदी अध्यापक व जेष्ठ शिक्षक श्री.सुकदेव गायकवाड व सचिन कुलकर्णी,आबासाहेब जाधव यांनी हिंदी दिनाचे महत्त्व व देशात हिंदी भाषा येणे किती गरजेची आहे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून हिंदी दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. 
        या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीने करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार हिंदी अध्यापक सुकदेव गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.