News Cover Image

ओतूर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

ओतूर - डांग सेवा मंडळ नाशिक संचलित माध्यमिक,उच्च माध्यमिक व न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल ओतूर येथील वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा मा.हेमलताताई बिडकर ह्या होत्या. कार्यक्रमाची सुरवात संस्थापक अध्यक्ष कर्मवीर दादासाहेब  बिडकर,संस्थेचे माजी सचिव स्व.विजयजी बिडकर व विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
       कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीम.जयश्री पवार यांनी केले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात ज्युनिअर के.जी पासून तर 12 वी पर्यंतच्या कलाकारांनी आपल्या कला आविष्कारातून बाल गीते, नाटक,मराठी गाणे,देशभक्तीपर गीते,आदिवासी गीते,लोकगीते,हिंदी रिमिक्स गाणे, लावणी,मुक अभिनय,अहिराणी गाणे इत्यादी ३७ गाण्यातून कला प्रदर्शन दाखवले. या कलाकारांना श्री.सचिन कुलकर्णी,श्रीम.शालिनी साळुंके,श्री.भूषण पवार व उच्च माध्यमिक व न्यू इंग्लिश मिडियमच्या सर्व महिला शिक्षिकां यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी संचालक श्री.चंद्रात्रे सर,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष शांताराम मोरे,पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष मंगेश देसाई,पर्यवेक्षिका वसुधा आचार्य,सरपंच श्रीमती पार्वत गांगुर्डे, उपसरपंच श्रीम.जान्हवी मोरे,दिपक आहेर,पत्रकार ज्ञानेश्वर वानखेडे,रविंद्र आहेर,रविकांत सोनवणे,शाबानजी  पठाण,ज्ञानेश्वर मोरे,भिकन देवरे,डॉ.मेणे इत्यादी प्रमुख पाहुणे व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
       उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुकदेव गायकवाड व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यार्थिनी मृदुला मोरे,रिद्धी देसाई,लावण्या अहिरे,तनुजा देवरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्वच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.