News Cover Image

*ओतूर विद्यालयाच्या मुलींनी कबड्डीत मिळवले विजेतेपद

ओतूर -डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेच्या पेठ येथे झालेल्या संस्था स्तरीय क्रीडा स्पर्धेत माध्यमिक विद्यालय ओतूर येथिल मुलींच्या कबड्डी संघाने मुल्हेर येथिल मुलींच्या कबड्डी संघावर मात करत विजेतेपद मिळवले आहे. 
      विजेता संघाला चषक व खेळाडूंना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत ओतूर संघात उत्कृष्ट खेळाडू म्हणून वैष्णवी देसाई हिचा सन्मान करण्यात आला. या खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री.सी.टी.आचार्य यांचे  मार्गदर्शन लाभले.
      वरील सर्व यशस्वी खेळाडू विद्यार्थिनी व मार्गदर्शक क्रीडा शिक्षक श्री.सी.टी. आचार्य यांचे डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा मा.हेमलताताई बिडकर,सचिव सौ.मृणालताई जोशी तसेच सर्व संचालक मंडळ,विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीम.जयश्री पवार,पर्यवेक्षिका सौ.वसुधा आचार्य व सर्व शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.