ओतूर- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ओतूर येथे सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली व सर्व मंत्रिमंडळ सदस्यांचा शपथविधी सोहळा घेण्यात आला.
यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री पवार यांनी मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री सह सर्व मंत्रिमंडळ सदस्यांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री म्हणून लावण्या अहिरे, उपमुख्यमंत्री ओमकार देसाई, अभ्यास मंत्री तनिष्का शिरसाठ, क्रीडामंत्री सिद्धी देसाई, स्वच्छता मंत्री रुपाली देवरे, सांस्कृतिक मंत्री कोमल देशमुख,आरोग्य मंत्री अनिल पालवी, पर्यावरण मंत्री ओम मोरे, सहल मंत्री पूर्वी देवरे आदी विद्यार्थी मंत्री यांनी शपथ घेतली.
कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले होते. शपथविधी सोहळ्यासाठी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका वसुधा आचार्य यांच्या सह सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
