ओतूर ( दि.१९ फेब्रुवारी २०२६) डांग सेवा मंडळ नाशिक संचलित माध्यमिक, उच्चमाध्यमिक व न्यू इंग्लिश मिडियम स्कुल ओतूर येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम.जे.पी.पवार ह्या होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व शिवआरती कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीम.जे.पी.पवार,पर्यवेक्षिका सौ.व्ही.सी.आचार्य, सर्व विभागातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
त्यानंतर विद्यालयातील बालशिवभक्तांपासून ते ९ वी पर्यंतच्या शिवप्रेमींनी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास वक्तृत्व, कविता,चारोळी,शायरी,पोवाडा व नृत्य अशा विविध शैलीतून मांडून व सादरीकरण करून उजाळा दिला.
त्यानंतर श्री.एस.एस. कुलकर्णी, श्री.आबासाहेब जाधव, श्री.आबासाहेब जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास,स्वराज्य निर्मितीसाठी केले योगदान,शौर्य,घटना,प्रसंग इत्यादी आठवणीतून कार्याला उजाळा देऊन मार्गदर्शन केले तर पर्यवेक्षिका सौ.व्ही.सी.आचार्य यांनी मार्गदर्शन करून शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पाणी बाटली भेट दिल्या. त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम.जे.पी.पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास सांगून विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांच्यासारखे महान कार्य करुन मावळे तयार व्हावेत असे आवाहन केले व सर्व शिवभक्त, शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.एस.एस.कुलकर्णी यांनी केले तर फलक लेखन श्रीम.एस. आर.साळुंके, छायाचित्रण व व्हिडीओग्राफी श्री.ए.एस.गीते यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्वच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
