News Cover Image

माध्यमिक विद्यालय ओतूर येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बाल दिन साजरा

ओतूर ( दि.१४ नोव्हेंबर २०२५) डांग सेवा मंडळ नाशिक संचलित माध्यमिक, उच्चमाध्यमिक व न्यू इंग्लिश मिडियम स्कुल ओतूर येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्ताने बाल दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम.जे.पी.पवार ह्या होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या  प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीम.जे.पी.पवार व सर्व विभागातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
      त्यानंतर सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.एस.एस. कुलकर्णी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे भारत निर्मितीसाठी केलेले कार्य व योगदानाची माहिती सांगितली तर विद्यालयाचे शिक्षक श्री.आबासाहेब जाधव यांनी बालदिन का साजरा केले जातो ते सांगितले. त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम.जे.पी.पवार यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे कार्य व १४ नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून का साजरा केला जातो याविषयी मार्गदर्शन केले.
    त्यानंतर विद्यालयातील इयत्ता ५ वी च्या विद्यार्थिनींनी विविध बालगीतांचे सादरीकरण केले तसेच वाढदिवस असलेल्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.