News Cover Image

माध्यमिक विद्यालय ओतूर येथे संस्थेचे माजी सचिव स्व. विजयजी बिडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन...

ओतूर (दि.४ऑक्टोबर२०२५)- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय ओतूर व न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल ओतूर येथे स्वर्गीय डॉ. विजयजी बिडकर साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमा पुजन करण्यात आले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका  श्रीमती जयश्री पवार या होत्या. यावेळी विद्यार्थीनी तनिष्का शिरसाठ हिने डॉ.साहेब यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. यावेळी डॉ. साहेबांच्या स्मृतींना मुख्याध्यापिका जयश्री पवार ,पर्यवेक्षिका वसुधा आचार्य , सचिन मालपुरे,आबासाहेब जाधव यांनी उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कुलकर्णी यांनी केले. डॉ.साहेब यांच्या स्मृतीदिनानिमित्त विद्यालयाचे प्रयोगशाळा सहाय्यक श्री.अश्विन गीते यांनी इ. ५ वी ते १० वी च्या सर्व विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. तसेच आरोग्यवर्धिनी केंद्र व माध्यमिक विद्यालय ओतूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी व आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.