News Cover Image

ओतूर विद्यालयाच्या मुख्यमंत्री पदी लावण्या अहिरे, तर उपमुख्यमंत्री पदी ओमकार देसाईची निवड..

      ओतूर- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्यमंत्री पदी लावण्या अहिरे तर उपमुख्यमंत्री पदी ओमकार देसाई यांची निवड झाली आहे.
     विद्यार्थ्यांना निवडणूक प्रकियेचे माहिती व्हावी व लोकशाहीत मतदानाचे महत्त्व समजावे यासाठी विद्यालयात शाळेच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदासाठी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.या शालेय निवडणूकीचे विशेष म्हणजे फॉर्म भरण्यापासून ते प्रचार करण्यापर्यंत सर्वच प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रकियेमध्ये विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया कशी राबविली जाते ते जाणून घेतले.
        विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम.जयश्री पवार यांनी विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया व लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचे महत्त्व समजावून सांगितले व येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणूकांमध्ये आपल्या घरातील व परिसरातील मतदारांना लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी करावे असे सांगितले.शालेय मतदान प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.सचिन कुलकर्णी व श्री.विश्वास चौधरी यांनी काम पाहिले. विद्यालयात मतदान घेण्यासाठी दोन मतदान कक्ष तयार करण्यात आले होते. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी म्हणून तनुजा देवरे,मृदुला मोरे,रिद्धी देसाई,साक्षी वाघ,मृणाल वानखेडे,वैशाली मोरे,प्रियंका गवांदे,देवश्री गवांदे,सई शिरसाठ,डिंपल देशमुख यांनी काम पाहिले. या निवडणुकीमध्ये तनिष्का शिरसाठ,लावण्या अहिरे,सिद्धी देसाई,ओमकार देसाई आदी उमेदवार निवडणूक रिंगणात होते आणि 582 मतदार होते. 
      निवडुन प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यालयातील सर्वच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले व निवडणूक प्रक्रियेत विद्यार्थी मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी झाले.