ओतूर- डांग सेवा मंडळ,नाशिक संचलित माध्यमिक,उच्च माध्यमिक विद्यालय व न्यू इंग्लिश मिडियम स्कूल ओतूर येथे नविन तयार करण्यात आलेल्या गार्डनचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्षा श्रीम.हेमलताताई बिडकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी मा.ताईसाहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण ही करण्यात आले यावेळी नविन उद्यानासाठी मा.ताईसाहेब यांनी फुल झाडे ही भेट दिली. त्यानंतर परिपाठाच्या वेळी सर्व विद्यार्थ्यांशी हितगुज साधला व प्रिती सोनवणे या विद्यार्थिनीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुलाब पुष्प देऊन तिला शुभेच्छा दिल्या व पुस्तके घेण्यासाठी आर्थिक मदत ही केली. यावेळी विद्यालयांच्या मुख्याध्यापिका श्रीम.जे.पी.पवार, पर्यवेक्षिका श्रीम.व्ही.एस.आचार्य व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
