ओतूर - डांग सेवा मंडळ नाशिक संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ओतूर येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्ताने शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका श्रीम.जयश्री पवार,पर्यवेक्षिका वसुधा आचार्य,सर्व शिक्षक व विद्यार्थी मुख्याध्यापिका तनुजा देवरे,उपमुख्याध्यापिका मृदुला मोरे,पर्यवेक्षिका सई शिरसाठ यांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेप्रती आदरभाव म्हणून पर्यावरणाच्या रक्षणासाठी शाळेला फुलझाडे व रोपे भेट दिली व सर्व गुरुजनांचा पेन व गुलाब पुष्प देऊन सन्मान केला. या कार्यक्रमावेळी वैष्णवी देसाई, पुजा देसाई,ओम मोरे,ओम देसाई,पुर्वी देवरे,सई शिरसाठ,मृदुला मोरे ,तनुजा देवरे आदी विद्यार्थी शिक्षकांनी मनोगत व्यक्त करून शिक्षकांविषयी आदर व्यक्त केला. तर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री पवार,पर्यवेक्षिका वसुधा आचार्य,जेष्ठ शिक्षक सुकदेव गायकवाड,सचिन कुलकर्णी,सचिन मालपुरे,संदिप राठोड आदी गुरुजनांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जीवनात यशस्वी होण्याचे गुरुमंत्र सांगितले. या दिनानिमित्त एका दिवसाचे शालेय कामकाज विद्यार्थी शिक्षकांनी पाहिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन लावण्या अहिरे, रिद्धी देसाई यांनी केले तर आभार तनिष्का शिरसाठ हिने मानले. कार्यक्रमाचे फलक लेखन कलाशिक्षिका शालिनी साळुंके यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.
