ओतूर :- डांग सेवा मंडळ,नाशिक संचलित माध्यमिक विद्यालय ओतूर येथिल राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेला एकुण 11 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 2 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यामध्ये तनिष्का संदिप शिरसाठ ही विद्यार्थीनी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाली आहे. त्याबद्दल तिचे व मार्गदर्शक शिक्षक श्री.राठोड सर यांचे मा.संस्थेच्या अध्यक्षा सौ.हेमलताताई बिडकर, मा.सचिव सौ.मृणालताई जोशी, सर्व संचालक मंडळ व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एस.एस.बोवा, सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
