News Cover Image

ओतूर विद्यालयात श्रावण क्वीन स्पर्धा संपन्न...

      ओतूर :- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ओतूर येथे श्रावण क्वीन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमासाठी सरपंच पार्वताताई गांगुर्डे, ग्रामपंचायत सदस्य जानवीताई मोरे ह्या उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्या जयश्री पवार, परिक्षक वैशाली पगार, रश्मी पगार, पर्यवेक्षक वसुधा आचार्य यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करून करण्यात आली.
       या स्पर्धेच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका वसुधा आचार्य यांनी केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या जयश्री पवार ह्या होत्या. स्पर्धेमध्ये विद्यार्थिनींनी रॅम्पवॉक केला व त्यानंतर स्पर्धकांना श्रीम. शितल शेळके व मनिषा शिरसाठ यांनी प्रश्न विचारले. या स्पर्धेमध्ये एकुण २४ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत श्रावण क्वीन प्रथम क्रमांक-धनश्री देवरे, द्वितीय क्रमांक-कल्याणी वाघ, तृतीय क्रमांक-रुपाली भोये तर वेशभूषा-भारती पवार, आत्मविश्वास-सुहानी जाधव, रॅम्पवॉक-भाग्यश्री मोरे, Best Smile-स्नेहा निकम,Best Attitude-भाग्यश्री वाघ हे विजेता ठरले. 
       या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.भारती पवार यांनी केले तर आभार श्रीम. मनिषा शिरसाठ यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अश्विन गीते, जितेंद्र बोरसे यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.