News Cover Image

ओतूर विद्यालयाच्या प्रांगणात दहीहंडी व गोपाळकाला उत्साहात साजरा..

     ओतूर  -(दिनांक १६ ऑगस्ट, २०२५)- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित माध्यमिक,उच्च माध्यमिक विद्यालय व न्यू इंग्लिश मिडीयम स्कुल ओतूरच्या प्रांगणात *दहीहंडी व गोपाळकाला* उत्सव साजरा करण्यात आला. 
        यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम.जयश्री पवार व जितेंद्र बोरसे सपत्नीक राधा-श्रीकृष्णाची आरती व पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यांनतर सांस्कृतिक विभाग प्रमुख सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण-राधा यांच्या गाण्यावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बालगोपालांपासून ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. यावेळी न्यू इंग्लिश मिडियम ते विद्यालयातील सर्वच विभागातील विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण-राधेचा पोशाख परिधान केला होता. त्यानंतर विलास खैरनार यांनी तयार केलेला स्वादिष्ट गोपाळकाल्याचा प्रसाद विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी श्रीकृष्ण-राधा यांच्या गाण्यावर नृत्य करत मनमुराद आनंद लुटला.
       कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका वसुधा आचार्य यांच्यासह सर्वच विभागातील कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.